Tarun Bharat

Satara; अपहृत अल्पवयीन युवतीच्या शोधासाठी मातापित्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगारास दिले जातेय अभय; न्यायासाठी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्जव

Advertisements

सातारा प्रतिनिधी

माण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचे अपहरण त्याच गावातील संशयिताने केले आहे. त्याबाबत संशयिताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गावचा माजी सरपंचाकडून पोलिसांच्यावर दबाव आणला जात आहे. तसेच त्या युवतीच्या आईवडिलांना दमदाटी केली जात आहे. युवतीचा शोध घेतला जात नाही, असा आरोप करत अपहरण झालेल्या युवतीच्या आईवडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या मुलीचे वय 17 वर्ष आहे. तिला दि. 8 मे 2022 रोजी पहाटे गावातील युवकाने पळवून नेले. त्याबाबतची फिर्याद रितसर त्याच दिवशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. परंतु या घटनेला दोन महिने उलटले तरीही पोलिसांनी कसलीही कार्यवाही केली नाही. मुलीचा शोध घेतला नाही. त्यामुळे सर्व कुटुंबिय चिंतेत आहे. मुलीच्या जीवाला काय बरे वाईट होणार नाही ना?, झाल्यास काय करायचे?, पोलीस प्रशासन कसलीही दखल घेत नाही, असा आरोप करत संशयिताचा चुलता त्याच गावातील माजी सरपंच आहे. त्याने त्या युवतीच्या वडिलांना बोलवून घेवून त्याच्या पुतण्यासाठी मुलीला मागणी केली होती. तेव्हा मुलगी अज्ञात आहे असे सांगून तिच्या वडिलांनी नकार दिला होता. तेव्हा संशयिताच्या चुलत्याने तुझी मुलगी उचलून नेली तर काय करशीलअशी धमकी दिली होती. तसेच माझे हात लांबपर्यंत आहेत तु काहीही करु शकत नाहीस, अशीही धमकी दिली. त्यामुळे पोलिसांकडून कसलीही कार्यवाही झाली नाही. संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

पोलीस कर्मचाऱयांना वाढदिनी सुट्टी

Patil_p

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मंगळवार दि. 26 रोजी सायकल रॅलीचे आयोजन

Patil_p

सातारा : भूस्खलनाच्या अहवालास जावळीच्या उपअभियंता कडून केराची टोपली का ?

Abhijeet Shinde

कराडच्या मंडईत एकावर तलवार हल्ला

Patil_p

वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना निरोप

Patil_p

फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तिघा मोटारसायकल चोरट्यांना केलं जेरबंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!