Tarun Bharat

सातारा पोलीस फिट पोलीस

जिम ओनर ची अभिनव योजना

प्रतिनिधी/ सातारा शहर

सातारा जिल्हा जिम चालक मालक संघटने तर्फे सातारा पोलिसां साठी सातारा पोलीस फिट पोलीस ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती जिम ओनर असोसिएशन चे अध्यक्ष नवनाथ साळुंखे यांनी दिली

   आज आपण रात्री निर्धास्त पणे झोपू शकतो ,रस्त्याने रात्री अपरात्री  बिनधोकपणे फिरू शकतो रस्त्यावरून आपली वाहने व्यवस्थित चालतात कारण आपल्या सभोवताली आहेत आपले रक्षणकर्ते ,”सद् रक्षणाय खल निघ्रनाय” हे ब्रीदवाक्य घेऊन सदैव  ऊन वारा पाऊसाची परवा नकरता आपली सेवा बजावणारे आपले पोलीस .

आपल्या साठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या पोलीस बांधवांप्रति कृतज्ञता म्हणून जिम असोसिएशन तर्फे जिह्यातील पोलिसांसाठी एक उपक्रम हाती घेण्यात आले यात रोजच्या ताणतणावा पासून पोलिसांची मुक्तता व्हावी त्यांचे आरोग्य उत्तम रहावे या करिता जिम मधील फिटनेस मास्टर ट्रेनर कडून आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा फिट्स सेमिनार होतील यात आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी, उत्तम पोषक आहार ,योग्य व्यायाम, शिवाय महिला पोलिसांसाठी अक्रोबिक्स चे सेशन खास महिला ट्रेनर कडून घ्यात येतील याच प्रमाणे राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले फिटनेस ट्रेनर यांचे ही सेमिनार घेण्यात येतील आणि हे सर्व पोलीस बांधवांसाठी अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे

 या बाबत सातारा जिल्हा जिम ओनर असोसिएशन च्या शिष्टमंडळाने श्री दिपकजी प्रभावळकर यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी नुकतीच भेट घेतली आणि या उपक्रमाबद्दल माहिती देऊन चर्चा करण्यात आली ,या वेळी पोलीस अधीक्षकांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत या बाबत सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना केल्या ज्या मुळे ही योजना प्रत्यक्षात सुरवात होण्यास मदत होईल  या वेळी सातारा जिल्हा जिम ओनर असोसिएशन चे अध्यक्ष आणि माजी महाराष्ट्र श्री नवनाथ साळुंखे , अमित माळवदे,सुशांत माने, किशोर बाबर,रोहन आंबेकर, राजेश परदेशी, राजेश साळुंखे, उमेश मोहोटकर,परेश लाटकर, सचिन गभाले, किरण माने, यांच्या सह जिम चालक मालक उपस्थित होते  

पोलीस आपल्या साठी जे करतात त्याची परतफेड आपण करू शकत नाही मात्र आपण कृतज्ञ तर होऊ शकतो ,याच भावनेतून हा उपक्रम राबविणार असून या उपक्रमाचाच एक भाग म्हणून जिह्यातील एकशे पन्नास हुन अधिक फिटनेस जिम मध्ये पुरुष आणि महिला पोलिसांसाठी 

मासिक फी मध्ये तबबल 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे

हे उपक्रम लवकरच सुरू होणार असून पोलीस बांधवांनी याचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा

ङनवनाथ साळुंखे -अध्यक्ष सातारा जिल्हा जिम ओनर असोसिएशनङ

Related Stories

पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाण्याचा फवारा

Patil_p

महाराष्ट्रात 16,867 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

लाच प्रकरणातील कॉल रेकॉर्डचा तपास सुरु

Patil_p

वाकळवाडीत कोरोनाबाधिताची संख्या पोहचली तीनवर

Patil_p

सातारलाही बनावट क्रीडाप्रमाणपत्राच्या संसर्गाची बाधा!

Patil_p

भाजप आमदारांकडून सभागृहातच धमक्या ; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Archana Banage