दिंडीत चांगले काम केल्याबद्दल प्रमाणपत्र देवून केले कौतुक
प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्ह्यातून वारी जात असताना जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्यातीने चांगले काम केले आहे. त्या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांचा गौरव करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सातारा जिल्ह्यात वारीचे आगदान झाल्यापासून ते वारी बाहेर जाईंपर्यंत वारीच्या मार्गावरची स्वच्छता व त्या परिसरातील गावांची स्वच्छता राखण्याचे काम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून करण्यात आली. त्यामळे याच कामाची दखाल घेऊन सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव