Tarun Bharat

Satara; सातारा जिह्याच्या विकासासाठी भरीव योगदान देवू- मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची ग्वाही

Advertisements

सातारा प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे सरकार साधणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोणताही जिह्याकडे दुजाभाव केला जाणार नाही. सातारा जिह्याच्या भरीव विकासासाठी या सरकारच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील अशी ग्वाही डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. ते मंत्री झाल्यानंतर प्रथमच साताऱयातून जात असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.

जिह्यात मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे दुपारी आगमन झाले. शासकीय विश्रामगृहावर भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य ऍड. भरत पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक विजय काटवटे, जिल्हा सरचिटणीस राहुल शिवनामे, शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांच्याशी सातारा जिह्यात हर घर तिरंगा हे अभियान कशा पद्धतीने सुरु आहे या अभियानाबाबत भाजपाकडून चांगल्या प्रकारे कामकाज सुरु असल्याचे आम्हाला अहवाल आले आहेत, असे सांगत पुढे ते म्हणाले, समाजकल्याणच्या ज्या विविध योजना आहेत. त्या योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. पारदर्शकता आणण्याकरता माझा प्रयत्न राहणार आहे. संपूर्ण राज्याचा विकास दुप्पट वेगाने करण्यासाठी आमचे सरकार कटीबद्द असून पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही जिह्याचा दुजाभाव आमच्याकडून होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Related Stories

कराड पालिकेच्या ताफ्यात आणखी 1 रूग्णवाहिका

Patil_p

मालकाच्या गीताने मंत्रमुग्ध होऊन मालकाच्या पाठी हुबेहूब जाणारी जिमी (डॉग)

Patil_p

जिल्हय़ातील 26 गुन्हेगारांना मोक्का

Patil_p

लोकांना हवाय आता कडक लॉकडाऊन

Patil_p

सातार्‍यात शिवजयंती निमित्त कलम 144 लागू

Abhijeet Shinde

हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन खिरखंडीत

Patil_p
error: Content is protected !!