ऑनलाईन टीम/तरुण भारत
सातारा: चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकराने प्रेयसीसह दोन मुलांची हत्या केली.साताऱ्यातील (Satara) कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला.या तिहेरी हत्याकाडानंतर परिसरात खळबळ माजली आहे.दत्ता नारायण नामदास असे संशियित आरोपीचे नाव आहे.याच्या विरोधात रहमतपूर पोलीस ठाण्यात तिघांच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.चारित्र्यांच्या संशयावरुन संपूर्ण कुटुंब नष्ट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Lover Killed Woman In Satara)
मिळालेल्या माहितीनुसार, संशियित आरोपी दत्ता नामदास हा मृत महिला आणि तिच्या मुलांसोबत वेलंग परिसरात राहत होता. मृत महिला आपल्या पतीपासून विभक्त होऊन त्याच्या सोबत राहत होती. 15 जून रोजी चारित्र्याच्या संशयावरून या दोघांच्यात कडाक्याचे भांडण लागले. याचा राग मनात धरुन दत्ताने रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपल्या प्रियसीचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याने तिच्या दोन मुलांना शेजारील विहिरीत ढकलून देऊन अकलूजला पलायन केले.
दुसऱ्या दिवशी घराला असलेली कडी पाहून काही स्थानिक नागरिकांना संशय आला. घडलेला सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती रहिमतपूर पोलिसांना दिली.पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेवून विहिरीतील मृतदेह बाहेर काढले.तसेच अकलूजमधून संशियित आरोपीला ताब्यात घेतले.