Tarun Bharat

Satara; साताऱ्यातून दोन जणांना तडीपार; पोलीस अधीक्षकांकडून आतापर्यंत १५१ जणांना तडीपर

Advertisements

सातारा प्रतिनिधी

सातारा शहर पोलीस ठाणे आणि शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत गर्दी, मारामारी, आदी गुन्ह्यातील रेकॉर्डवरील ऋत्विक जितेंद्र शिंदे(वय 23, रा.गोडोली), अक्षय उर्फ बॉम्बे सुनील जाधव( वय 28, रा.बस्सप्पा पेठ) या दोघांना सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपरी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिले. बंसल यांनी आत्तापर्यंत १५१ जणांना तडीपार केले आहे. या दोघांचा तडीपारचा प्रस्ताव सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी पाठवला होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋत्विक शिंदे आणि त्याचा साथीदार अक्षय जाधव या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाणे आणि शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गर्दी मारामारी, आदेशाचा भंग करणे, मारामारी करून दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, अपहरण करून दरोडा टाकणे, जबरी चोरी खुनाचा प्रयत्न करून जबरी चोरी व दुखापत गर्दी मारामारी करणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने त्या दोघांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाची चौकशी व सुनावणी होऊन त्या दोघांस महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये सातारा जिल्ह्यातून ६ महिन्याकरिता हद्दपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिलेला आहे. या दोघांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेतून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा जिल्ह्याच्या हाती हिंसक घटना घडवून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आले आहे. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरवणाऱ्या समाजात बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या डोळ्यांच्या विरुद्ध तळीवारीची कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून 49 प्रस्तावातील बेकायदेशीर कारवाई करणारे 151 जणांना हद्दपारचे आदेश दिले आहेत. या कामी प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस यांनी योग्य तो पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

व्यापाऱयांनी मांडली जिल्हाधिकाऱयांकडे कैफियत

Patil_p

केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

datta jadhav

‘कृष्णा’ लसीकरणासाठी पुन्हा सज्ज

Patil_p

कोरेगावात मोबाईल चोऱया करणारा अल्पवयीन ताब्यात

Omkar B

सातारा : अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी महासंघांची निदर्शने

datta jadhav

चारधाम यात्रेसाठी निघालेले पाच यात्रेकरु ठार

Patil_p
error: Content is protected !!