Tarun Bharat

दि.१८ रोजी पाणी पुरवठा बंद

गोडोली – प्रतिनिधी

सायन्स काँलेजजवळ जीवन प्राधिकरणाच्या दाब नलिकेला लागलेली गळती काढण्याचे मंगळवार १७ मे रोजी काम सुरू झाले आहे. त्यामुळे काम पुर्ण झाले नंतर बुधवार दि.१८ रोजी सकाळी पाणी पुरवठा असलेल्या भागात होणार नाही , मात्र सायंकाळ पासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे शाखा अभियंता महादेव जंगम यांनी सांगितले.

सातारा शहर आणि परिसरातील ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत लष्कर पाणी पुरवठा केंद्राकडून पाणी पुरवठा केला जातो. त्या ग्राहकांना जीवन प्राधिकरण कडून १७ मे रोजी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज समोर मुख्य दाबन नलिकेला गळती लागलेली आहे. ते काम त्वरीत गळती काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे १८ मे रोजी सकाळच्या सत्रातील होणारा पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होईल.तरी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून करण्यात आले आहे.

Related Stories

रयत शिक्षण संस्था देशाचे भूषण

Patil_p

सलग सुट्टय़ांमुळे नंदनवनाला बहर

Patil_p

चुकीने ऑनलाईन ट्रान्सफर झालेले 35 हजार परत केले

Amit Kulkarni

सातारा : घरा-घरात झाले गौरीईचे आगमन, आज होणार पूजन

Archana Banage

साताऱयात बंदला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

शासनाने आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी

Patil_p