प्रतिनिधी/ सातारा
कणकवली, सिंधुदुर्ग येथे झालेल्या 80 व्या युथ मुलांच्या व 18 व्या युथ मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा संघातील खेळाडूंनी 3 सुवर्ण, 2 रौप्य, 7 कांस्य अशी एकूण 12 पदके मिळवून राज्य स्पर्धेचे सांघिक उपविजेतेपद पटकावले. या यशाबद्दल सातारा जिह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी खेळाडूंचा सत्कार करून अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मुलांमध्ये आयुष मोकाशी तर, मुलींमध्ये सपना चव्हाण आणि आर्या बारटक्के यांनी सुवर्णपदक मिळवले असून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. चैत्राली पवार आणि सृष्टी रासकर यांनी रजतपदक, श्रावणी बर्गे, वृषाली करंजे, सानिया शिंदे, सुमित घाडगे, साईल बेबले, साईराज पोतेकर आणि शिवम पवार यांनी कांस्यपदक मिळवले.
सर्व खेळाडूंना सातारा संघाचे प्रशिक्षक सागर जगताप, अमित सांगवान यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, विभागीय सचिव योगेश मुंदडा व पदाधिकाऱयांनी अभिनंदन केले. यावेळी सातारा जिह्यातील बॉक्सिंग क्लबचे पदाधिकारी अमर मोकाशी, रवींद्र होले, संजय पवार, मंगेश जाधव, देवेंद्र बारटक्के, सचिन दीक्षित,बापूसाहेब पोतेकर, महेंद्र पवार, यशश्री धनवडे, विनोद राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.