सातारा: शहरातील पोलीस मुख्यालयाबाहेर सोमवारी विशिष्ट समाजातील लोकांनी येवून गोंधळ निर्माण केला. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत समाजातील नागरिकांना बाजूला नेले. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा तणाव निवळला.
खुन्यातील आरोपीला सोडून दिल्याचा आरोप करत आज विशिष्ट समाजातील लोकांनी पोलीस मुख्यालय परिसरात गोंधळ घातला. त्यांचा आरडाओरड, दंगा पाहून ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी खुन्यातील आरोपीला मोकाट का सोडले? असा सवाल लोकांनी पोलिसांना केला. त्यावर पोलिसांनी गोंधळ करु नका. तो निर्दोष असे सांगत पोलिसांनी लोकांना बाजुला केले. स्थानिक गुन्हे शाखेकडे असणाऱ्या तपासात ज्या संशयिताला पकडले होते. तो निर्दोश असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या घटनेबाबत पोलिसांकडून कोणती अधिकृत माहिती दिली गेली नाही.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना हे सर्व आरोप फेटाळून लावले. एका संशयित विश्वास मोरे हा गुन्हेगार असून त्याच्यावर कारवाई केल्याने हा गोंधळ या लोकांना केला असल्याचे सांगितले.