ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पालकमंत्र्यांसह अन्य नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांच्या बालेकिल्ल्यात ठाण मांडून बसले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली.
चंद्रकांत पाटील पालकमंत्री पाटील यांच्या बालेकिल्ल्यात ठाण मांडून बसले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उत्तरामध्ये 70 टक्के मतदान होईल. तसेच या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोविडमध्ये जिल्हा परिषदेत (ZP) साहित्य खरेदीत झालेल्या घोटाळ्याविषयी बोलताना पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोना साहित्य खरेदीत जो घोटाळा झाला होता. त्यासंदर्भात याचिकाही भाजप जिल्हा परिषद सदस्याने दाखल केली होती. हाय कोर्टानेही (high court) जिल्हा परिषदेत कोरोना साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचे मान्य केले होते. परंतु पालकमंत्री यावर काहीही बोलायला तयार नाहीत.
तर सोमवारी भाजप उमेदवाराला मतदान (voting) करावे यासाठी पैसे वाटण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. यावर चंद्रकांत पाटील यांनी बोलताना काँग्रेसवर टीका केली. त्यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची टीका केली. तसेच माजी नगरसेविकेच्या कार्यालयात जे पैसे सापडले ते पैसे बूथ वरील कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी होते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते पराभव दिसू लागल्याने खोटे नाटे आरोप करत आहेत अशी टीका यावेळी केली.
तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, पैसे वाटण्याचा प्रकार सिद्ध झाला नसल्याने पुन्हा सचिन तोडकर (sachin todakar) यांच्या घरावर छापा टाकला पूर्ण साहित्य विस्कटून टाकले तरीही त्यांच्या हाताला काही लागले नाही, त्यामुळे शेवटी विरोधकांनी चौकात येऊन बोभाटा केला त्यामुळे काँग्रेसचा हा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच विरोधकांनी काल जो काही बोभाटा केला याचा कोणताही परिणाम होणार नाही या ठिकाणी भाजप विजयी होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला