Tarun Bharat

महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने केले-सतेज पाटील

Satej Patil on Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातने पळवल्याने आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काल शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय वर्तुळात या प्रकल्पाचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनीही तीन ट्विट करत शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने केल्याचे म्हटले आहे.

सतेज पाटील ट्विट करत काय म्हणाले,

धक्कादायक! महाराष्ट्रात होणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीची संयुक्त भागीदारी असलेला १ लाख ५८ हजार कोटींचा देशातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर उत्पादनाचा प्रकल्प सध्याच्या ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला नेण्यात आला आहे.वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारी असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण होता. हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये करण्याबाबत जवळपास निश्चित झाले असताना आणि याबाबत सर्व स्तरावर चर्चा झाली असताना अचानक हा प्रकल्प गुजरातला जाणे अत्यंत धक्कादायक आहे.

भविष्याच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी असून महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने आज केले आहे. असे ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले आहे. तर या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारनं प्रयत्न केले होते, असा दावा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Related Stories

शिये पाच दिवस लाॅकडाऊन : संसर्ग रोखण्यासाठी निर्णय

Archana Banage

कोल्हापुरात कार्यक्षमता वाढीसाठी पंचायत राज कर्मचाऱयांना ट्रेनिंग

Archana Banage

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Archana Banage

सक्रीय रूग्णसंख्येत सातारा राज्यात पाचवा

Patil_p

आमदार जाधव यांनी घेतली महापालिकेत आढावा बैठक

Archana Banage

महात्मा गांधी घराघरात पोहचतील, पण उपयोग होणार नाही : चंद्रकांत पाटील

Archana Banage