ऑनलाईन टीम/ तरुण भारत
कोल्हापूर: विरोधी पक्षांनी त्यांचे आमदार सांभाळावेत.आमच्या सोबत कोण आहे हे दहा तारखेला स्पष्ट होईल. सात जूनला महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार आहे. यावेळी अपक्ष आमदारही सोबत असतील.अपक्षांना महाविकास आघाडीचा विचार मान्य असल्याने ते सोबत असतील असे वक्तव्य पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. भाजप आणि काही अपक्ष संपर्कात असल्याच्या प्रश्नावर सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केले.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपने आपला तिसरा उमेदवार उभा करुन महाविकास आघाडीला कोंडीत पकडले आहे. दोन्ही पक्ष आपला उमेदवार निवडून येणार या मतावर ठाम आहेत. मात्र भाजपचा तिसरा उमेदवार म्हणजे धनंजय महाडिक यांना निवडून येण्यासाठी १० मतांची आवश्यकता आहे.
दरम्यान धनंजय महाडिक यांना उमेदवारी देताच १० मतांची बेगमी करणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले. यावरुन ते १० आमदार कोढून आणणार यावर सत्ताधारी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यावरुन आज सतेज पाटील यांनी टोला लगावला आहे. आमच्या सोबत कोण आहे हे दहा तारखेला स्पष्ट होईल. विरोधी पक्षांनी त्यांचे आमदार सांभाळावेत असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
+