Tarun Bharat

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच सतेज पाटलाचं मोठं वक्तव्य, वाचा काय म्हणाले

Advertisements

कोल्हापूर: जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण नुकतेच जाहीर झालं, त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महत्वाचे विधान केलंय. जिल्ह्यातील आगामी निवडणुका एकत्र लढविण्याच्या बाबतीत त्यांनी हे विधान केलंय. जिथं शक्य आहे तिथं आम्ही आघाडी करून निवडणूक लढवू, पण ज्या तालुक्यात शक्य नाही तिथं आम्ही स्वतंत्र लढू, असे पाटील म्हणालेत. शिवसेना आमच्यासोबत येणार असेल तर त्यांना सोबत घेऊन लढू, महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी तयारी असल्याचं पाटील म्हणालेत. ते कोल्हापुरात बोलत होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, यासाठी राष्ट्रवादी सोबत चर्चा होईल, शिवसेनेशी चर्चा होईल, त्यानंतर आमची भूमिका ठरवू, पण निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्यास सांगितलंय. त्यामुळं हे सर्व महिनाभरात होईल का? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केलाय.

राज्यसभा खासदारांना खासदार मंडलिक,मानेंनी उत्तर द्यावं
कोल्हापूर विमानतळावरून जिल्ह्यात श्रेयवादावरून राजकारण ढवळून निघालंय. त्यावरून माझी पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी मंत्री असताना कोल्हापूर विमानतळाबद्दल पाठपुरावा केलाय. खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी देखील पाठपुरावा केला आहे. संभाजीराजे छत्रपती ज्यावेळी खासदार होते, त्यावेळी त्यांनी देखील पाठपुरावा केलाय. हे नाकारून चालणार नाही. पण राज्यसभा खासदारांच्या श्रेय घेण्यावरून विचारात असाल तर त्याला खासदार मंडलिक, धैर्यशील मानेंनी उत्तर द्यावं, त्यावर मी बोलणं योग्य नाही, असे पाटील म्हणाले. तसंच मुंबई कोल्हापूर विमान सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं.

Related Stories

हुपरीचे दोन महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी

Abhijeet Shinde

शेंदुरजणेच्या युवतीची 2 लाखाची फसवणूक

Patil_p

हरियाणामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 32 हजार पार

Rohan_P

मोफत ‘मोदी’ एक्सप्रेस

datta jadhav

काळोशीच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

Patil_p

फलटण सभापतींच्या घरातून चोरी

Patil_p
error: Content is protected !!