Tarun Bharat

अतिक्रमणावर सॅटेलाईट प्रणालीची नजर

Advertisements

कॅन्टोन्मेंटमध्ये अत्याधुनिक प्रणालीची निर्मिती : कार्यालयात बसून मिळणार अतिक्रमणाची माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

सेंटर ऑफ एक्सिलेन्स ऑन सॅटेलाईट ऍण्ड अननेम्ड रिमोट व्हेईकल इनिशिएटिव्ह (सीईओ-सर्क्हेआय) ने कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित सॉफ्टवेअर विकसित केले आहे. जे उपग्रह प्रतिमा वापरून ठराविक कालावधित अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांसह जमिनीवरील कोणतेही बदल स्वयंचलितपणे शोधू शकतात. या प्रणालीचा वापर करून कॅन्टोन्मेंट बोर्ड आता अतिक्रमणावर नजर ठेवणार आहे. त्यामुळे कार्यालयात बसूनही अतिक्रमणाची माहिती मिळणार आहे.

 जमिनीवर झालेले बदल शोधण्याचे सॉफ्टवेअर सेंटर ऑफ एक्सिलेन्स ऑन सॅटेलाईट ऍण्ड अननेम्ड रिमोट व्हेईकल इनिशिएटिव्ह आणि भाभा अणू संशोधन केंद्र, विशाखापट्टणम यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. सध्या या प्रणालीचा वापर प्रशिक्षित सॉफ्टवेअरसह नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर कार्टोसॅट-3च्या छायाचित्राचा वापर केला जातो. वेगवेगळय़ा कालखंडातील उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण करून जमिनीवरील बदल शोधले जातात.

 हे सॉफ्टवेअर देशातील 62 कॅन्टोन्मेंटमध्ये वापरण्यात येणार आहे. सॉफ्टवेअरद्वारे अलीकडच्या काळात मिळालेल्या माहितीच्या आधारे जमिनीवर  झालेल्या बदलाची पडताळणी केली जाते. या प्रणालीद्वारे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना (सीईओ) बदल ओळखण्यास पूरक ठरते. जर बदल झाले असल्यास त्याची शाहनिशा करून जागेवर झालेले बदल अधिकृत आहेत का याची पडताळणी करता येवू शकते. या प्रणालीच्या आधारे अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाची माहिती घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण झाले असल्यास विलंब न करता योग्य कायदेशीर कारवाई करता येणार आहे.

 हे सॉफ्टवेअर अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त असून फिल्डवर काम करणाऱया कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांना आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यास उपयोगी ठरणार आहे. तसेच भ्रष्ट व्यवहारांना आळा घालण्यास मदत करते. उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत 1,133 अनधिकृत बदलांपैकी 570 प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित 563 प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रणलीद्वारे कॅन्टोन्मेंट हद्दीतील जागेवर झालेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रणालीद्वारे जागेवरील बदलावर आणि अतिक्रमणावर नजर ठेवली जाणार असून यापुढे अनधिकृत बांधकामाची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डला कार्यालयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांना परवानगी घेऊनच बांधकाम करावे लागणार आहेत.

Related Stories

शनिवारपासून भाजीमार्केट एपीएमसीत भरणार?

Patil_p

पालकमंत्री गोविंद कारजोळ आज बेळगावात

Amit Kulkarni

सिव्हिल हॉस्पिटलच्या रुणवाहिकांना मोफत डिझेल

Patil_p

मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा

Tousif Mujawar

छत्रपती शिवाजी महाराज-भगव्याची विटंबना करणाऱयांवर कारवाई करा

Patil_p

खानापूर-लोंढा-रामनगर रस्त्याची दुरवस्था

Amit Kulkarni
error: Content is protected !!