येत्या 30 जानेवारीला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकित मतदानापुर्वीच कॉंग्रसला (Congress) धक्का बसला आहे. शेवटच्या क्षणी झालेल्या राजकिय घडामोडीत पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी स्वताचा उमेदवारी अर्ज दाखल न करता आपला मुलगा सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दखाल केला. जरी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मी कॉंग्रेसचाच उमेदवार असल्याचे सांगितले असले तरी पक्षांतर्गत तांबे पिता पुत्रावर नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कॉंग्रस पक्ष त्यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सुधीर तांबे यांनी पक्षाबरोबर विश्वासघात केला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठींबा नसल्याचे जाहीर केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “सुधीर तांबे हेच कॉंग्रसचे अधिकृत उमेदवार होते पण त्यांनी अर्ज न भरून कॉंग्रेसचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार असलेले सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसचा पाठिंबा असणार नाही” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त करून कॉंग्रेसची भुमिका स्पष्ट केली.
भाजपवर आपला निशाणा साधताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले. “कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला पाठींबा असणार नाही. याबाबतचा अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठवू. हा सगळा भाजपचा ठरलेला कार्यक्रम होता. कॉंग्रेसच्या बंडखेर उमेदवाराविरोधात भाजप आपला उमेदवार देत नाही याचा अर्थ काय? भाजप विरोधकांना भय दाखवून त्यांची घरे फोडत आहे. पण ज्यादिवशी भाजपचे स्वताचे घर फुटेल त्यावेळी भाजपला दुसऱ्य़ाचे घर फुटल्याचे दु:ख काय असते याची जाणिव होईल” अशा परखड भावना व्यक्त केल्या.

