Tarun Bharat

आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन (satyendra jain) यांना मंगळवारी कथित मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात ९ जूनपर्यंत ईडी (ed) कोठडीत पाठवण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी अटक केली. AAP नेत्याच्या अटकेवर आम आदमी पार्टी (AAP) कडून तीव्र उमटत आहेत. तर आम आदमी पक्षाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी ही राजकीय खेळी असल्याचे म्हटले.

काही तासांच्या चौकशीनंतर जैन यांना सोमवारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले आणि मंगळवारी नियुक्त न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांंना ईडी कोठडी सुनावली.

आम आदमी पक्षाच्या (आप) नेतृत्वाखालील पंजाब सरकारच्या एका मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केल्याच्या काही दिवसानंतर जैन यांची अटक झाली आहे.

पंजाबचे उदाहरण देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले की, “आम्ही कोणताही भ्रष्टाचार खपवून घेत नाही आणि कधीही करणार नाही. पंजाबमध्ये आम्ही एका भ्रष्ट मंत्र्यावर कारवाई केली. आम्ही एजन्सीची वाट पाहत नाही. मी सत्येंद्र जैन यांच्या प्रकरणाचा अभ्यास केला आहे, त्यात तथ्य नाही. हे सर्व राजकीय षडयंत्र आहे.”

error: Content is protected !!