Tarun Bharat

सत्येंद्र जैन यांना 14 दिवसांची कोठडी

नवी दिल्ली ः

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस अव्हेन्यू कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्यांना 31 मे ते 9 जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. सीबीआयने नोंदवलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती.

जैन यांना गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणाचा 2017 पासून तपास सुरू असून 30 मे रोजी जैन यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 7 जून रोजी टाकण्यात आलेल्या छापा-झडतीदरम्यान ईडीने कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त केले होते. जैन आणि त्याच्याशी संबंधित असलेल्यांवर छापे टाकल्यानंतर ईडीने 2 कोटींहून अधिक रोख आणि 1.8 किलो वजनाचे सोने जप्त केले. आता जैन चौकशीत सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीने केला आहे.

Related Stories

देशात 46,254 नवे रुग्ण; 514 मृत्यू

Tousif Mujawar

ओबीसी सूची विधेयक राज्यसभेतही संमत

Patil_p

500 रुपयात सिलिंडरचे कमलनाथांचे आश्वासन

Patil_p

कोव्हॅक्सिन-कोव्हिशिल्डचा मिक्स डोसही परिणामकारक

Patil_p

दानपेटीतून उघडला शिक्षणाचा दरवाजा

Patil_p

दिल्लीतील मशिदीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मौलाना अटकेत

Archana Banage