देवस्थान आढावा बैठकीत जिध्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती
बैलहोंगल / वार्ताहर
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानचा तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर सर्वांगिण विकास करण्यासाठी आवश्यक ती पाउले उचलली जातील, असे प्रतिपादन बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. ते बुधवारी सौंदत्ती येथील =श्रीयल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन डोंगरावर सुरू असलेल्या विकास आढावा अधिकाऱयाच्या बैठकीत बोलत होते. ते पुढे म्हणाले की सोंदत्ती डोंगरावर स्वतंत्र पोलीस ठाणे प्रारंभ करण्यात येण्याबरोबर डोंगरावर येणाऱया भाविकांच्या हितदृष्ठीने स्वतंत्र आरोग्य केंद्र व भाविकांच्या स्वच्छतेकडे अधिक प्राधान्य देण्यात आले असून आतापर्यत भावविकांसाठी 246 वसतीगृहे बांधण्यात आली आहेत. लवकरच ती भाविकांसाठी उपलबध करून देणार असल्याचे सांच्गतले. तसेच 25 व्यापारी संकुले पूर्ण झाली असून त्वरित व्यापाऱयांना हस्तातरित करण्यात येईल असे सांगून 9 नोव्हेबंर रोजी संबधित देवस्थान अधिकारी व व्यवस्थापन समितीची पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचे सांगितले. Gित्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्रध्दास्थान व धार्मिकस्थळ म्हणून ख्याती असणाऱया यल्लम्मा देवस्थान परिसरातील स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात यावी. अशी कडक सूचना त्यांनी संबधित अधिकाऱयाना दिली. त्यांच्यासमववेत बेळगांवचे पोलीस प्रमुख डॉ संजीव पाटील बेळगाव जि,प सीईओ दर्शन. बैलहौगलचे प्रातांधिकारी शशीधर बगली.उपस्थित होते.