Tarun Bharat

समूहगीत गायन स्पर्धेत दोडामार्ग येथील सावंतवाडा प्रा. शाळेचे यश

दोडामार्ग / प्रतिनिधी –

लोकमान्य मल्टीपर्पज को-आँप सोसायटी लि. ने शालेय मुलांना अमृत महोत्सवात सहभागी करून घेणे हे अतिशय सुंदर मूल्यशिक्षण आहे. स्पर्धा म्हटली की क्रमांकापेक्षा सहभाग महत्वाचा असतो. असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा स्पर्धा परीक्षक गंगाराम गोसावी यांनी केले. समूहगीत गायन स्पर्धेत दोडामार्ग येथील सावंतवाडा प्राथमिक शाळेच्या समूहाने प्रथम क्रमांक पटकाविला.
दोडामार्ग राष्ट्रोळी मंदीर येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. लोकमान्यचे शाखाप्रमुख रमेश यशवंत सावंत,अकाउंट असिस्टंट संग्रामसिंग चव्हाण, वैभव वसंत रेडकर व सखाराम दळवी उपस्थित होते. शिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या प्राथमिक शाळांचे शिक्षकही उपस्थित होते या स्पर्धेस उत्तम प्रतीसाद मिळाला. स्पर्धा परीक्षक बाबाजी डांगे यांनी, लहान वयात मुलांवर संगीत पैलू पाडण्याचे अवघड काम शिक्षक करीत असल्याचे सांगत शिक्षक वर्गाचे कौतुक केले.

Related Stories

पंडीत पंचगव्य गुरूकुलने बनविल्या शेणापासून पर्यावरण पूरक पणत्या

Patil_p

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छ्ता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्ग महाविद्यालयात अंमली पदार्थ सेवन न करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

Anuja Kudatarkar

सहाय्यक निबंधक कार्यालयाचा शिपाई ‘लाचलुचपत’च्या सापळय़ात

Patil_p

कणकवली रुग्णालयासमोर दुचाकी गॅरेजला आग!

Anuja Kudatarkar

मृत्यूच्या तांडवापुढे फ्रान्स हतबल!

NIKHIL_N