सावंतवाडी/प्रतिनिधी-
महाराष्ट्र विधानसभेचे नूतन अध्यक्ष राहुल नार्वेकर सावंतवाडी चे सुपुत्र आहेत. राहुल नार्वेकर यांचा सावंतवाडीत सालईवडा येथे बंगलाही आहे. राहुल नार्वेकर यांचे आजोबा मुंबईला गेल्यानंतर नार्वेकर कुटुंबीय तेथेच स्थायिक झाले. परंतु त्यांची नाळ कायम सावंतवाडीशी राहिली. सालईवाड्यात नार्वेकर यांची वडिलोपार्जित जमीन आहे. तेथे सध्या बंगला असून तेथे राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या दोन्ही बंधूंच्या नावाचा उल्लेख आहे. त्या बंगल्यात सध्या कुणी वास्तव्यास नसून तो बंदच असतो. नार्वेकर कुटुंबीयांची आरोंदा येथे जमीनही आहे. नार्वेकर कुटुंबीय मातोंड घोडेमुख देवस्थानला मानत असल्याचे सांगण्यात आले. राहुल नार्वेकर यांच्या रूपाने सावंतवाडीच्या सुपुत्राला विधानसभा अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला आहे.. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी नार्वेकर कुटुंबीय मूळचे सावंतवाडीचे. त्यामुळे त्यांची विधानसभा अध्यक्षपदी झालेली निवड सावंतवाडीचा हा सावंतवाडीचा बहुमान असल्याचे सांगितले