Tarun Bharat

SBI चा पुढाकार; 30 कोटी खर्च करुन उभारणार कोविड रुग्णालये

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :   

देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक सीएसआर उपक्रमांतर्गत देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांमधील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दतिदक्षता विभाग असलेली तात्पुरती रुग्णालये उभारणार आहे. या रुग्णालयांसाठी स्टेट बँक 30 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती एसबीआयचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांनी  दिली.  

खारा म्हणाले की, कोरोनाने प्रभावित राज्यांमधील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बँकेने यापूर्वीच 30 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. तात्पुरती रुग्णालये उभारण्यासाठी बँक स्वयंसेवी संस्था आणि रुग्णालय व्यवस्थापनाच्या संपर्कात आहे.  

सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये 50 आयसीयू बेडसह एकूण 1000 बेड असलेली काही तात्पुरती रुग्णालये बांधायची आहेत. काही ठिकाणी 120 बेड तर काही ठिकाणी 150 बेडचे रुग्णालय उभारण्यात येईल. या रुग्णालयांना ऑक्सिजन सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालये आणि अशासकीय संस्थांशी चर्चा सुरू असल्याचेही खारा यांनी सांगितले.

Related Stories

लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

datta jadhav

अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला

Archana Banage

कुंभोज हातकणंगले रोडवर फोर व्हिलर गाडी पलटी; कोणतीही जीवित हानी नाही

Abhijeet Khandekar

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15 हजारच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उद्यापासून सुरुवात

datta jadhav

Kolhapur: उपनगरातील बोंद्रेनगरातील सार्वजनिक मंडळाची पर्यावरणपूरक विसर्जनला साद

Archana Banage