ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृहकर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून ग्राहकांसाठी गृहकर्जाचा व्याजदर 6.95 % असेल. यापूर्वी तो 6.70 टक्के होता.
स्टेट बँकेने मार्चमध्ये एक खास ऑफर जाहीर केली. या ऑफरनुसार, संपूर्ण महिनाभर गृहकर्ज 6.70 टक्के व्याजदराने उपलब्ध होते. संपूर्ण बँकिंग उद्योगात हा स्पर्धात्मक दर होता. आता स्टेट बँकेने किमान व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली. स्टेट बँकेनंतर इतर बँका आणि गृहकर्ज देणाऱ्या संस्थाही गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.