ऑनलाईन टीम/तरुण भारत
सर्वोच्च न्यायालायने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा (NEET PG Exam) २०२२ पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. तसेच परीक्षेचं आयोजन ठरलेल्या दिवशी करण्यात यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता नीट पीजीची परीक्षा २१ मे २०२२ रोजी होणार आहे.
नीट पीजी परीक्षा २०२२ (NEET PG Exam२०२२) पुढे ढकलण्याची मागणी देशभरातील विद्यार्थ्यांनी केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोविड ड्युटीमुळे यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे २१ मे रोजी होणारी परीक्षा किमान दहा आठवडे पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यावर आज (१३ मे) सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावत परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार असे यावेळी सांगितले.
सर्वोच्च न्यायालायने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायलायने म्हटलं की, परीक्षा पुढे ढकलण्यामुळे अराजकता आणि अनिश्चितता निर्माण होईल. तसंच यामुळे रुग्णांवर उपचारांवरसुद्धा परिणाम होईल. त्यामुळे NEET PG ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण होईल.
डॉक्टरांच्या करिअरवर परीक्षा पुढे ढकलण्याचा परिणाम होऊ शकतो. रुग्णांची सेवा करण्याला प्रथम प्राधान्य आहे. आता नीट परीक्षा ठरलेल्या वेळेत २१ मे रोजी आयोजित करण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यामुळे NEET PG च्या परीक्षेसाठी हॉलतिकिट लवकरच मिळतील असं म्हटलं जात आहे.