Tarun Bharat

नुपूर शर्माला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती

ऑनलाईन टीम/तरुण भारत

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी एका चॅनेलच्या कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा पडसाद संपूर्ण देशभर उमटले. एवढेच नव्हे तर आखाती देशातही नुपूर शर्मासह संपूर्ण भारताविरोधात रोष व्यक्त केला गेला. नुपूर शर्मा यांच्याविरोधात वाढता रोष लक्षात घेता भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. तर नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या काही लोकांची हत्या तर काही जणांना जिवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. असे असताना नुपूर शर्मा यांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) स्थगिती दिली आहे.

पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. १० ऑगस्टपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश देण्यात आले असून १० ऑगस्टलाच या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. तसेच, तिच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आले आहेत. (SC relief for Nupur Sharma, gets interim protection from arrest till August 10)

हे ही वाचा : शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा

दरम्यान, पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यांनतर विविध ठिकाणी नुपूर शर्मावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कोर्टानेही देशातील संपूर्ण प्रकरणाला नुपूर शर्मा जबाबदार असल्याचे म्हणत संपूर्ण जनतेची माफी मागण्यास सांगितले होते. तर नुपूर शर्माने विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यांनतर सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. तसेच, देशभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे एकाच ठिकाणी वर्ग करावेत अशी मागणीही तिने केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत नुपूर शर्माचे वकील मनिंदर सिंह यांनी म्हटलंय की नुपूर यांच्या जीवाला धोका आहे. नुपूर शर्माच्या हत्येविरोधात व्हायरल ऑडिओ क्लिप, सलमान चिश्तीचं वक्तव्य तसेच युपीतील एका नागरिकाने शीर कापण्याचे दिलेले आदेश या सर्वांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे तिच्या अटकेवर स्थगिती देण्यात आली असून पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

Related Stories

अभिषेक बॅनर्जी यांचे भाजपला आव्हान

Patil_p

रेपो रेटमध्ये वाढ; कर्ज महागणार

Archana Banage

उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात ; संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा थेट इशारा

Archana Banage

राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तोंडावर अयोध्येत कोरोनाची धडक!

Tousif Mujawar

काँगेस प्रवेश प्रस्तावाला प्रशांत किशोरचा नकार

Patil_p

काँग्रेस रया गेलेली हवेली

Archana Banage