कमकुवत हृदय असणाऱयांनी करू नका अर्ज
काही जॉब हे फुल टाइम असतात तर काही पार्ट टाइम. काही नोकऱयांमध्ये केवळ 2-3 तासच काम करावे लागते. परंतु काही जॉब्समध्ये अधिक मेहनतही करावी लागत नाही, सध्या एक अशीच नोकरी निघाली असून ती तुमची शारीरिक नव्हे तर मानसिक क्षमतेच्या कसोटी पाहणार आहे. प्रत्यक्षात या नोकरीत तुमच्या भीतीची पातळी तपासली जाणार आहे.
द डन्गन नावाच्या व्हेन्यूकडून प्रत्येक ठिकाणी अशा नोकरीची संधी देण्यात आली असून यात कमकुवत हृदय नसलेल्या लोकांनाच अर्ज करता येणार आहे. पर्यटकांमध्ये प्रसिद्ध या व्हेन्यूने स्वतःच्या नोकरीच्या संधीला जगातील सर्वात भीतीदायक नोकरी म्हणून जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केले आहे.
द डन्गनकडून लंडन, ब्लॅकपूल, एडिनबर्ग आणि न्यूयॉर्कमध्ये भीतीची पातळी तपासून घेणाऱया लोकांचा शोध घेतला जात आहे. या नोकरीला नावच ‘स्केयर टेस्टर’ देण्यात आले असून ते द डन्गनमध्ये होणारे शो पाहतील आणि यावर स्वतःची प्रतिक्रिया देणार आहेत. येथे होणारे शो हे भीतीदायक असतील, अर्ज करणाऱया व्यक्तीला कुठल्याही एका साइटवर नव्हे तर 4 ठिकाणी जात भीतीदायक शो पहावे लागणार आहेत.
घाबरणारा जाणार घरी
अर्ज करणाऱया उमेदवाराला प्रथम लंडनमधील सर्वात भीतीदायक इमारत 50 बर्कले स्क्वेअर येथे हॉरर शो दाखविण्यात येईल. यशस्वी उमेदवाराला मग न्यूयॉर्कमध्ये आत्मा आणि भूतांचा शो पहावा लागणार आहे. अखेरीस त्याला ब्लॅकपूलमध्ये ग्रिम रिपरमध्ये जाऊन भीतीदायक शो पहावा लागेल. चालू वर्षातील सर्वात सुदैवी किंवा दुर्दैवी चाहत्याला सर्वात भीतीदायक डन्गन हॅलोवीन शो दाखविण्यात येतील असे द डन्गनच्या महाव्यवस्थापकाने म्हटले आहे.