Tarun Bharat

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची जाहीर

पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत झालेल्या पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. उत्तरसूचीवरील आक्षेप, त्रुटींचे निवेदन आणि विद्यार्थ्यांच्या माहितीतील दुरुस्ती नोंदवण्यासाठी 28 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अंतरिम उत्तरसूची http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर पालकांना आणि शाळांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. उत्तरसूचीवरील आक्षेप, त्रुटी ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून स्वीकारल्या जाणार नाहीत. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीमध्ये, शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी शाळांच्या लॉग इनमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आहे. या दुरुस्तीसाठी 28 ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठवल्यास, मुदतीनंतर पाठवलेल्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नसल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : ‘गुड टच बॅड टच’ च्या समुपदेशनात मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड, सात वर्षांनंतर आरोपीवर गुन्हा दाखल

Related Stories

पोलीस, होमगार्डला मारहाण केल्याप्रकरणी चौघे ताब्यात

Patil_p

कराड पालिकेच्या ताफ्यात नवी रुग्णवाहिका दाखल

Patil_p

‘विद्यार्थी – भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ चर्चासत्र शनिवारी

Tousif Mujawar

मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय मायोपिया आजाराचा धोका

Patil_p

महाराष्ट्रात आतापर्यंत 73 टक्के कोरोना लसीकरण

Tousif Mujawar

Naseeruddin Shah Hospitalized : बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल

Archana Banage