Tarun Bharat

शाळा इमारत बांधकाम युद्धपातळीवर

कंग्राळी बुद्रुकला दुसऱया मजल्याचे बांधकाम : सरकारी-माजी विद्यार्थी-दानशूरांची मदत

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक येथील मराठी प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे बांधकाम शासकीय मदत, माजी विद्यार्थ्यांच्या व इतर दानशूर व्यक्तींच्या आर्थिक मदतीतून करण्यात येत आहे.

रविवारी दुसऱया मजल्याच्या बांधकामाचे पूजन व बांधकामाचा शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी उद्योजक व शिक्षणप्रेमी किरण तरळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व हेस्कॉम खात्याचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

शंकर कोनेरी यांनी युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदतीचा ओघ सुरू ठेवून शाळेचे बांधकाम पूर्णत्वास आणण्याचे आवाहन केले. हेस्कॉम खात्याच्या आजी-माजी कर्मचाऱयांच्या हस्ते दीपप्रवलन व सरस्वती फोटो पूजन करण्यात आले.

हेस्कॉमचे निवृत्त कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी श्रीफळ वाढविले. निवृत्त कर्मचारी मारुती कडोलकर यांच्या हस्ते बांधकामाचे पूजन करण्यात आले. मराठी मायबोलीसाठी मराठी शाळांची प्रगती करणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी सढळ हस्ते मदत करण्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मान्यवरांनी दिलेल्या देणग्या

मारुती रामचंद्र पाटील, एम. आर. पाटील, सुरेश कडोलकर, दीपक निलजकर, तुकाराम बसरीकट्टी, कल्लाप्पा कोनेरी, मनोज पाटील, प्रत्येकी 5001 रुपये, मारुती भरमा कडोलकर 5051 रुपये, सुनील कागणकर 3001 रुपये, चंद्रकांत पाटील 2100 रुपये, केदारी अष्टेकर 1201 रुपये, कल्लाप्पा पाटील, यशवंत अष्टेकर, प्रत्येकी 1001 रुपये, किरण तरळे व दादासाहेब भदरगडे दोघांनी मिळून 25000 रुपये दिले.

यावेळी दत्ता पाटील, राजू मन्नोळकर, नितीन पवार, दादासाहेब भदरगडे, यल्लाप्पा पाटील, उमेश पाटील, अनिल पावशे, मोहन भैरटकर, संदीप कोळी, सागर भेकणे, गोपाळ पाटील, परशराम बसरीकट्टी, शंकर पाटील, गोपाळ पवार, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Stories

कंप्लीट कराटे अकादमीच्या विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान

Amit Kulkarni

विमान दुर्घटनेत बेळगावच्या वैमानिकाला वीरमरण

Patil_p

कंझ्युमर फोरम बेळगावमध्येच ठेवा

Amit Kulkarni

दर्शन रावळ, सीयाना कॅथरीन यांची उद्या लाईव्ह कॉन्सर्ट

Amit Kulkarni

बेळगाव-पुणे विमानसेवा काही दिवसांसाठी पुन्हा रद्द

Amit Kulkarni

प्रश्नमंजुषा माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!