केजरीवाल सरकारकडून मुलांना मोठी भेट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली सरकारने शनिवारी भगतसिंह आर्म्ड फोर्सेस प्रिपरेटरी स्कूलचे उद्घाटन केले आहे. ही शाळा मुलांसाठी पूर्णपणे मोफत असून यात मुलांना सैन्यभरतीची तयारी करता येणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
एनडीएपासून नौदल, वायुदलात भरती होण्यासाठी मुलांना येथे प्रशिक्षण मिळविता येणार आहे. सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱया दिल्लीमधील मुलामुलींकरता ही मोठी संधी असणार आहे. 18 हजार मुलामुलींनी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. या शाळेत वसतिगृहाची सुविधा असून ती पूर्णपणे मोफत असणार आहे. या शाळेत प्रत्येकाला एकसमान सुविधा मिळणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.