Tarun Bharat

सुट्टीतली शाळा…

उत्तरार्ध

 या सगळय़ातून बाजाराचं म्हणजेच मार्केटिंग उत्तम तंत्र शिकायला मिळालं. एकदा तर ज्यांच्या कैऱया तोडल्या, त्यांनाच द्यायला गेलो आणि थोडक्मयात वाचलो. सकाळच्या वेळात फिरायला गेलं की पक्षांची भाषा हळूहळू समजायला लागायची. आई मला भुणभुण करू नको असं जे म्हणते तो शब्द भुंग्याच्या गुणगुण आवाजावरून नेमका कळला. आई मला नाकतोडा का म्हणते हे नाकतोडा पाहिल्यावर मला कळलं. कधीच एका जागी न बसणारा नाकतोडा जणू काही नाच करतो की काय असंच वाटायचं. खारुताई आणि टिटव्या यांचे कर्कशः आवाज आम्ही शाळेत एकमेकांच्या अंगावर जसं ओरडतो त्याची जाणीव करून द्यायचे. निसर्गाचं संगीत ऐकताना एक वेगळाच अनुभव यायचा. झुळझुळणारे झरे, वाऱयाचे घोंगावणे, पानांची सळसळ या पानातून झालेली मध्येच खसखस किंवा फुसफुस आवाज वेगळय़ा कुठल्यातरी प्राण्यांची चाहुल करून द्यायचा. भारद्वाज मात्र एखाद्या अंगात आलेल्या बाईसारखा घूघू असा आवाज काढायचा. आम्हीसुद्धा या संगीत सभेत सामील व्हायचो. कानावरती चाफ्याचे फूल, हातामध्ये चाफ्याची अंगठी अशा थाटात मोठय़ा कलाकारासारखं आम्हीपण गाणे म्हणायचो पण आमच्या आवाजाने मात्र सभेतील सगळे हे आजूबाजूचे प्राणी उडून जायचे, नाहीतर पळून जायचे. या निसर्गाच्या शाळेत प्रत्येक जण आपापलं काम व्यवस्थित करायचा. मला नागरिकशास्त्राचे धडे खरं म्हणजे इथे शिकायला मिळाले. शाळेत शिकलेल्या अनेक गोष्टी इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या. माझी आजी घरात आणलेली फळ खाऊन झाली की त्यातील बिया आवर्जून वाळत बाहेर ठेवायची. खरबूज, टरबूज, कैरी, जांभूळ, बोरं, चिंचा, असा बियांचा खजिनाच आम्हाला घरी मिळायचा. पण ह्या नुसत्या खायच्या नाहीत तर या बियांचे मातीचे गोळे बनवून माळरानावरती जाऊन गोफणीने दूरवर फेकायचे.आणि मागच्या वेळी फेकलेल्या बिया रुजल्याचे प्रगती पुस्तक दाखवायच्या, उजाड माळरान हिरवा गार झालेला दिसायचा. सुट्टीतला आणखी एक उद्योग म्हणजे सूर्याची उन्हं पेटीत भरून ठेवायची आणि ही पेटी म्हणजे सोलर कुकरच्या रुपात आम्हाला रोज विविध पदार्थ करून द्यायची. कचरा जाळताना अंगणात आमचं सुंदर बार्बे क्मयू चालू असायचं. कांदे भाजून खाणार, मक्मयाची कणसं, बटाटे अशा कितीतरी गोष्टी आम्ही मजेत खात असायचो. इथे खाल्लेलं कधीही बाधत नसायचं. एकदा अंगणात खेळत असताना मला झाडावर मुंगळे येजा करतांना दिसले. मला वाटलं त्यांना कवायत शिकवावी. लगेच कामाला लागलो. तर सगळे मुंगळे गायब ……तेवढय़ात त्या मुगळय़ांनी माझ्यावर असा हल्ला केला की शिस्तीत चालणंच काय बसणंही विसरले. आमच्या गोठय़ात असलेली गुरं आणि मी नदीत मस्त डुंबायला जायचो. घरी आल्यानंतर रवंथ करत बसायचो. मला येता-जाता बकरीसारखा चरू नको असं का म्हणतात? याची तिथे ओळख पटायची. ही निसर्गाची शाळा बिनपरीक्षेची पण बरंच काही शिकवून जाणारी, आनंद देणारी सुट्टी मनापासून हवीच हवी.

Related Stories

‘सुरक्षा समिती’च्या पुनर्रचनेची गरज

Patil_p

जून का महिना

Patil_p

ऋषी सुनक यांचा स्थलांतरविषयक उपक्रम

Patil_p

वीजबिले, बियाणे, खत प्रश्नी राजकीय औदासिन्य

Patil_p

सांत्वन करणारी माणसे

Patil_p

संतुलिन श्वसन पद्धती

Patil_p