Tarun Bharat

भोगावती नदीत बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू

Advertisements

राधानगरी /प्रतिनिधी

भोगावती नदीत अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पोहायला गेलेल्या एका मुलीचा बुडून मृत्यू झाला. प्रसंगावधान दाखवल्यामुळे तिच्या सोबतच्या दुसऱ्या मुलीचा जीव वाचला. आज सकाळी नऊ वाजता सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथे दुर्घटना घडली. सई नामदेव चौगुले (वय 10) ती असे मृत मुलीचे नाव असून ती सध्या तिसरी इयतेत शिकत होती, तर तनुजा तानाजी चौगुले (वय 13) ही बचावली. घरातील महिलांसोबत कपडे धुण्यासाठी या दोघी नदीवर गेल्या होत्या.

गेल्या चार पाच दिवसापासून भोगावती नदीतील प्रवाह बंद असल्याने पाणी कमी झालेले होते. त्यामुळे या मुली पात्रातील कमी पाण्यात पोहत होत्या. राधानगरी धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यात आले होते. त्याच्या वेगवान प्रवाहात या दोघी वाहू लागल्या. यापैकी तनुजा कशीबशी पोहत काठाकडे आल्यावर महिलांनी तिला ओढून घेतले. मात्र सई गटांगळ्या खात पाण्यात बुडाली. दुर्दैवाने यावेळी अन्य मुले किंवा पुरुष तेथे नव्हते महिलांनी आरडाओरडा केल्यावर आलेल्या लोकांनी तिला बाहेर काढले मात्र ती बेशुद्ध झाली होती. तिला तत्काळ राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

Related Stories

कोल्हापुरात दुधाचे एटीएम मशीन…

Abhijeet Shinde

गद्दारांना माफी नाही; जयसिंगपूरात आदित्य ठाकरे गरजले

Abhijeet Khandekar

राजकारण्यांना तुमचा वापर करू देऊ नका

Abhijeet Shinde

Sangli; महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी यासाठी विराट मोर्चाचे आयोजन

Abhijeet Khandekar

माजी आमदार अ‍ॅड. नानासाहेब माने यांचे निधन

Abhijeet Shinde

अन् या क्षणी झाली… पंतप्रधान नरेंद्र मोदींना महात्मा गांधींची आठवण

Kalyani Amanagi
error: Content is protected !!