जपानच्या रेस्टॉरंटमधील अजब प्रकार
प्रत्येक धर्मात पवित्र ग्रंथ असतात, ज्यात त्या धर्म, परमेश्वराशी निगडित गोष्टी नमूद असतात. लोक या धर्मग्रंथांना वेगवेगळय़ा प्रकारे प्रकाशित करत असतात. सद्यकाळात लोक विश्वविक्रम करण्यासाठी या गंथांना सर्वात छोटय़ा कागदावर लिहितात. परंतु तुम्ही कधी खाद्यपदार्थांवर धर्मग्रंथ लिहिलेला पाहिला आहे का? नसेलच. जपानमधील एक रेस्टॉरंट सध्या प्रसिद्धीच्या झोतात आले असून यात खाण्यासाठी दिल्या जाणाऱया नूडल्सवर धार्मिक ग्रंथ लिहिलेले असतात.
जपानच्या ओटा शहरात नित्तानोशो कानजेनटी नावाचे रेस्टॉरंट असून तेथील नूडल्स लोकप्रिय ठरत आहेत. रेस्टॉरंटमध्ये सेक्रेड नूडल्स देण्यात येतात. हे नूडल्स खाण्यासाठी नव्हे तर गिफ्ट म्हणून घरी नेण्यासाठी असतात. एखाद्या धर्मग्रंथाप्रमाणे या नूडल्सवर पवित्र मंत्र कोरण्यात आले आहेत.
नूडल्सवर बौद्ध धर्मातील हार्ट सूत्र कोरण्यात आले आहेत. बौद्ध धर्मात याला सर्वात पवित्र मंत्र मानले जाते. बौद्ध धर्माशी निगडित अनेक मंदिरांमध्ये हार्ट सूत्र कागदांवर लिहून दिला जातो. या नूडल्सकरता बांबूमधून प्राप्त चारकोल आणि गव्हाने तयार कॅरामेल कलरिंगचा वापर केला जातो. अशा स्थितीत हे नूडल्स शरीरासाठी अपायकारक नसतात.
हार्ट सूत्र स्वतःच्या घरात एकटे असताना वाचणे योग्य मानले जाते याचमुळे हे नूडल्स केवळ घरी नेण्यासाठी दिले जातात. तीन लोकांना पुरतील इतक्या नूडल्सचे एक पॅक 950 रुपयांपर्यंत मिळते.