Tarun Bharat

महागाई विरोधात एसडीपीआयची निदर्शने

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईचा भडका उडत आहे. आता अन्न धान्यावर जीएसटी लावून संपूर्ण देशातील गोरगरीब जनतेला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला आहे. त्या विरोधात आता विविध संघटना आंदोलन करत आहेत. बुधवारी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

अच्छे दिन आनेवाले हे असं सांगून मोदी सरकारने साऱ्या जनतेला बुरे दिन दिले आहेत. आता आम्हाला अच्छे दिन नको बुरे दिनच पाहिजेत, असे म्हणत केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदविला आहे. यावेळी एसडीपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन

Amit Kulkarni

सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा

Amit Kulkarni

युवा महोत्सवात केएलई विद्यापीठाला अजिंक्यपद

Amit Kulkarni

आंबेवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिकसाठी निवड

Amit Kulkarni

युजीसी-नेट चे नवीन वेळापत्रक जाहीर

Abhijeet Shinde

विनामास्क फिरणाऱया ग्रामपंचायत सदस्यांनाच दंड

Amit Kulkarni
error: Content is protected !!