Tarun Bharat

बेळगाव ग्लॅडीएटर संघाकडे सीगन चषक

Advertisements

सद्दाम होसकोटी मालिकावीर, सिद्धेश साळवी सामनावीर

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

सिद्धेश साळवीची भेदक गोलंदाजी व अलिम माडीवाले, अजर यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावरबेळगाव ग्लॅडीएटर संघाने केआर शेट्टी किंग्ज संघाचा एक गडय़ांनी पराभव करुन सीगन चषक पटकाविला. सद्दाम होसकोटीला मालिकावीर, सिद्धेश साळवीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने 20 षटकात सर्व बाद 142 धावा केल्या. रोहित देसाईने 37, प्रशांत लायंदरने 29 तर सुनील सक्रीने 17 धावा केल्या. ग्लॅडीएटरतर्फे सिद्धेश साळवीने 19 धवांत तर सद्दाम होसकोटीने 25 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव ग्लॅडीएटर संघाने 20 षटकात 9 बाद 143 धावा करुन सामना एक गडय़ाने जिंकला. अलिम माडीवालेने 38, अजरने 31 तर सद्दाम होसकोटीने 21 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे वासीम धामणेकरने 20 धावांत 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश सोनवालकर, रफीक गोकाक, ऍड. एन. बी. पाटील, ऍड. सुधीर सक्री, विजय कुरी, नासीर पठाण आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव ग्लॅडीएटर संघाला व उपविजेत्या के. आर. शेट्टी किंग्ज संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज सिद्धेश साळवी, उत्कृष्ट फलंदाज प्रशांत लायंदर तर मालिकावीर सद्दाम होसकोटी यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

Related Stories

सायकलवरून मृतदेह नेल्याप्रकरणी काँग्रेसची सरकारवर टीका

Patil_p

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मनोज देसाईला सुवर्णपदक

Amit Kulkarni

शहापूर येथे किटवाडच्या तरुणाची आत्महत्या

Patil_p

‘ई-आस्ती’च्या नोंदीसाठी अभियंते करणार मालमत्तांची चाचपणी

Patil_p

टोयाटा-ट्रक अपघातात युवक ठार

Patil_p

सात महिन्याच्या बालिकेसह 9 जण कोरोनामुक्त

Tousif Mujawar
error: Content is protected !!