क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना अयोजित सीगन चषक वरि÷ क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून सीगन क्रिकेट क्लबने शहापूर क्रिकेट क्लबचा 2 गडय़ांनी, लक्ष क्रिकेट अकादमीने डायमंड सुपर क्लब अथणी संघाचा 2 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अनिल गवी व वसंत शहापूरकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर कपिल व विनोद तेवले यांना इम्पॅक्ट खेळाडू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शहापूर इलेव्हन संघाने 15.2 षटकात सर्व बाद 67 धावा केल्या. अक्षयने 24, हरिषने 13 धावा केल्या. सीगनतर्फे अनिल गवीने 10 धावात 4 तर वीरेश गौडरने 9 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीगन संघाने 18 षटकात 8 बाद 68 धावा केल्या. कपिलने 28, बसवराजने 23 धावा केल्या. शहापूरतर्फे प्रतिकने 2 गडी बाद केले.
डायमंड क्लब अथणी संघाने 16.1 षटकात सर्व बाद 79 धावा केल्या. नंतर लक्ष क्रिकेट अकादमीने 16.3 षटकात 8 बाद 83 धावा करून सामना 2 गडय़ांनी जिंकला.