Tarun Bharat

सेबी चार कंपन्यांच्या मालमत्तेचा करणार लिलाव

साधारण 10 जानेवारीपर्यंत लिलाव शक्य

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे पैसे गोळा करणाऱया इन्फिनिटी रियलकॉन आणि सुमंगल इंडस्ट्रीजसह चार कंपन्यांच्या एकूण 25 मालमत्तांचा 10 जानेवारी रोजी लिलाव केला जाणार असल्याचे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) यांनी सांगितले की,

सेबीने जाहीर सूचनेमध्ये म्हटले आहे की, बेकायदेशीररित्या उभारलेली रक्कम वसूल करण्यासाठी या कंपन्यांच्या मालमत्तेचा पुढील महिन्याच्या 10 तारखेला लिलाव करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

या कंपन्यांमध्ये जीएसएचपी रियलटेक आणि इन्फोकेअर इन्फ्रा यांचाही समावेश असणार आहे. 

चार कंपन्यांच्या एकूण 25 मालमत्तांचा लिलाव करून विक्रेत्यांकडून पैसे वसूल केले जातील, असेही सेबीने सांगितले. यासह, एकूण राखीव मूल्य 12.2 कोटी रुपये आहे. जास्तीत जास्त 16 मालमत्ता इन्फिनिटी रियलकॉनच्या आहेत तर सुमंगलच्या पाच आणि जीएसएचपी आणि इन्फोकेअरच्या प्रत्येकी दोन मालमत्तांचा लिलाव होणार आहे.

Related Stories

इसुझू मोटर्सची वाहने बाजारात उतरवण्याची योजना

Omkar B

अर्थसंकल्पातून व्हावा ‘वंगणपुरवठा’

Patil_p

फियोची निर्यात क्षेत्रासाठी व्यापक पॅकेजची मागणी

Patil_p

10 कंपन्यांकडून 5 लाख 13 हजार कोटींची भर

Patil_p

एचईजी समभागाचा उत्तम परतावा

Patil_p

LIC शेअर्सहोल्डरला देणार गुडन्यूज!

datta jadhav