Tarun Bharat

बनावट उताऱयांसाठी तीन दिवसांत दुसरी तक्रार

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

बनावट उताऱयांवर झालेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मनपाच्या अधिकाऱयांनी तीन दिवसांत दुसरी तक्रार दिली आहे. मार्केट पोलिसांनी ही तक्रार स्वीकारली असून आता तपासात काय निष्पन्न होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

मनपाचे महसूल निरीक्षक अमित सहदेव यळकार यांनी शुक्रवारी पोलिसांत तक्रार दिली. संबंधितांना बोलावून त्यांची चौकशी करावी व कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्जात केली आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी पुढील तपास करीत आहेत.

27 जुलै 2022 रोजी कर वसूल करणाऱया आनंद इटगी यांनी एका भूखंडासंबंधीचे फॉर्म क्रमांक 2 चे झेरॉक्स आणून दिले. ही कागदपत्रे संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आपण कार्यालयातील सॉफ्टवेअरमध्ये पाहणी केली असता अनधिकृत मालमत्ता असल्याचे निदर्शनास आले. पीआयडी क्रमांकावरून कागदपत्रांची पडताळणी केली असता ही कागदपत्रे आपल्या कार्यालयातून दिली नसल्याचे आढळून आले, असे महसूल निरीक्षकांनी तक्रारीत म्हटले आहे.

सीटीएस नंबर 5627, प्लॉट क्रमांक 6 संबंधीचे नमुने फॉर्म क्रमांक 2 ची कागदपत्रे मनपातून दिली नाहीत. कोठे तरी ती तयार केली असून याची सत्यासत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अर्जात केली आहे.

दि. 3 रोजी समर्थनगर येथील व्यवहारासंबंधी तक्रार केली होती. तीन दिवसांत दुसऱयांदा पोलिसांत तक्रार केली आहे. मोठय़ा प्रमाणात फसवणूक होऊनही एफआयआर का दाखल करण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Stories

बेकिनकेरे परिसरात रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करा

Omkar B

जेवणात झुरळ अन् बिम्स प्रशासनाची पळापळ!

Patil_p

दादागिरी करून पैसे उकळणारा पोलीस गजाआड

Omkar B

शहरातील 12 हजार घरांमध्ये गॅसपुरवठा

Patil_p

अन्…अधिकाऱयांच्या पायाखालची वाळू घसरली

Patil_p

कनकदास जयंती यावर्षी साध्या पद्धतीने साजरी करा

Omkar B
error: Content is protected !!