Tarun Bharat

दुसरी लिजेंड्स क्रिकेट लीग 16 सप्टेंबरपासून

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दुसरी लिजेंड्स लिग क्रिकेट स्पर्धा 16 सप्टेंबरपासून खेळविली जाईल, अशी घोषणा शुक्रवारी स्पर्धा आयोजकांनी केली. या स्पर्धेतील पहिला सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त स्पर्धा आयोजकांनी खास प्रदर्शनीय सामना आयोजित केला आहे.

इंडिया महाराजास आणि विश्व जायंटस् यांच्यात हा प्रदर्शनीय सामना खेळविला जाईल, अशी माहिती या स्पर्धेचे प्रमुख आणि माजी क्रिकेट प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. इंडिया महाराजास संघाचे नेतृत्व भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुलीकडे सोपविण्यात आले असून विश्व जॉयंट्स संघाचे नेतृत्व इंग्लंडचा माजी कर्णधार मॉर्गन करणार आहे. 2019 आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱया इंग्लंड संघाचे नेतृत्व मॉर्गनने केले होते. हा प्रदर्शनीय सामना झाल्यानंतर एक दिवसानंतर प्रत्यक्षात दुसऱया लिजेंडस् लिग क्रिकेट स्पर्धेला 17 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल. ही स्पर्धा 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून एकूण चार संघांचा सहभाग राहिल. 22 दिवसांच्या कालावधीत या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळविले जातील.

Related Stories

इंग्लंडची दुसऱया डावात आक्रमक सुरुवात

Patil_p

सात्विक-चिराग शेट्टी दुसऱया फेरीत

Patil_p

रमीझ राजा राजीनामा देण्याच्या तयारीत

Patil_p

निकोलस पूरन, रोस्टन चेस विंडीजचे उपकर्णधार

Omkar B

वर्ल्ड चॅम्पियन कोलमनवर दोन वर्षांची बंदी

Omkar B

बंगाल, तामिळनाडूची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!