पुणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यात : वकीलांच्या फॉर्म हाऊन वरून घेतले ताब्यात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गज्या मारणे फॉर्म हाऊसवर
प्रतिनिधी/सातारा
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची खंडणी मागून व्यवसायिकांचे अपहरण करणाऱ्या कुख्यात गुंड गज्या मारणे गजाआड झाला आहे. काही दिवसापासून या प्रकरणात तो फरार झाला होता. पुणे पोलीस त्यांचा शोध घेत होते. तोच रविवारी सायंकाळी त्याला बावधन येथील वाकेश्वर येथील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्या फॉर्म हाऊस वरून ताब्यात घेण्यात आले. तो कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आल्याचे ऍड. ठोंबरे यांनी सांगितले.
खंडणीच्या गुह्यातील मुख्य आरोपी गज्या मारणे हा गेल्या काही दिवसापासून फरार होता. पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक हे त्यांच्या वॉच वर होते. तोच रविवार दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्या फॉर्म हाऊसवर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने त्याला फॉर्म हाऊस वरून ताब्यात घेतले. हे पथक गज्याला घेऊन पुण्याला रवाना झाले. या प्रकरणी ऍड. ठोंबरे यांनी तो कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आल्याचे सांगितले. या प्रकरणी 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये साताऱ्यातील अमर शिवाजी किर्दत (वय 46, रा. कोडोली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय 50, रा. समर्थनगर, कोडोली, जि. सातारा), नितीन पगारे (रा. सातारा) यांच्याही समावेश आहे. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई ही करण्यात आलेली आहे. गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे याला खंडणी विरोधी पथक चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
गज्या मारणे जिल्हयातून दुसऱ्यांदा ताब्यात
गुंड गज्या मारणे याला आणखी एका गुह्यात काही दिवसापुर्वी जावली ता. मेढा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तोच खंडणीच्या गुह्यात दुसऱ्यांदा तो बावधन येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे. याची माहिती मिळताच जिह्यात चर्चांना उधान आले आहे.