Tarun Bharat

Kolhapur : 10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

Kolhapur : इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात/परिसरात 7 दिवस 144 कलम लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद होणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.

10 वी व 12 च्या परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहेत. ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी हा कलम लागू करण्यात आला आहे. परीक्षा कालावधीत तसेच ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी घातली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती गुन्हा नोंद केला जाणार आहे. बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही, असेही कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं, 6 जणांचा मृत्यू

datta jadhav

पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनला बंदी

Archana Banage

आष्टा नगरीच्या उपनगराध्यक्षपदी तेजश्री बोंडे यांची बिनविरोध निवड

Archana Banage

बेळगाव सीमावादावर विधानसभेत अजित पवारांनी विचारला सरकारला प्रश्न

Archana Banage

सांगली ते बारामती, कराड ते पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण कधी ?

Archana Banage

कोल्हापुरात आज गोलमेज परिषद; मराठा आरक्षण आंदोलनाचे बिगुल वाजणार

Archana Banage