Tarun Bharat

अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मुंबईत भाजपच्या अध्यात्मिक सेलकडून आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असं विधान केलं होतं. भाजप आणि शिंदे गटाने या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन छेडली आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह आज साताऱयातही अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहेत. मुंबईत भाजपच्या आध्यात्मिक सेलकडून आंदोलन केलं जाणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या देवगिरी शासकीय या निवासाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अधिक वाचा : नोटाबंदीचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अजित पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Related Stories

शेतजमिनीवरुन सावत्र भावाकडून बहिणीस मारहाण

Patil_p

गांधीनगर बाजारपेठ सात दिवस बंद राहणार

Archana Banage

कसब्यात मुख्यमंत्र्यांचे ‘रोड शो’तून शक्तिप्रदर्शन

datta jadhav

#CycloneTauktae : पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा

Archana Banage

जलयुक्त शिवारला ठाकरे सरकारकडून क्लीन चिट

datta jadhav

ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर : डॉ. रोहिदास बोरसे

prashant_c