Tarun Bharat

अणुप्रकल्पांसाठी सुरक्षा यंत्रणा निर्माण होणार

सायबर हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी देखरेख व्यवस्था ः केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

@ वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

सायबर हल्ल्यांपासून देशातील अणुऊर्जा प्रकल्पांना वाचविण्यासाठी सुरक्षा यंत्रणा निर्माण केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान तसेच तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली आहे. या सुरक्षा यंत्रणेत अथॉरिटी, ऍक्सेस कंट्रोल, स्ट्रिक्ट कंट्रोल आणि प्रत्येक प्रणालीची देखरेख सामील असेल.

अणुऊर्जा प्रकल्प यंत्रणा ही इंटरनेटशी जोडली गेलेली नाही तसेच प्रशासकीय नेटवर्कशी ती संलग्न नाही. परंतु आता अणुऊर्जा प्रकल्पांसाठी प्रशासकीय नेटवर्कही मजबूत केले जाईल. याकरता अनेक योजना तयार करण्यात आल्या आहेत. यात इंटरनेट आणि प्रशासकीय इंट्रानेट कनेक्टिव्हिटी अधिक बळकट करणे, रिमूव्हेबल मीडियावर बंदी घालणे, वेबसाइट्स आणि आयपी ब्लीक करणे यासारख्या कृती सामील असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पावरील सायबर हल्ल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. याची चौकशी कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऍडव्हायजरी ग्रूप-डीएई आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यासारख्या राष्ट्रीय यंत्रणांनी केली होती अशी माहिती सिंह यांनी दिली आहे.

सिक्योरिटी सिस्टीम्स

राष्ट्रीय यंत्रणांच्या शिफारसींच्या आधारावर इंट्रानेट आणि इंटरनेट ऍक्सेसचे फिजिकल सेपरेशन, इंटरनेट वापरासाठी सुरक्षित व्हर्च्युअल ब्राउजिंग टर्मिनल, सिक्योर डाटा ट्रान्सफर नियम, नवे वेब ऍप्लिकेशन पोस्ट करण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा किंवा एलएएनमध्ये परिवर्तन करण्याचे पाऊल उचलले जाणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरल आर्किटेक्चर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पोस्चरच्या देखरेखीसाठी एक कृतिदल स्थापन करण्यात आले आहे.  

2019 मध्ये सायबर हल्ला

तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पावर यापूर्वी सायबर हल्ला झाला होता. अणुऊर्जा महामंडळाने पूर्वी हल्ला झाला नसल्याचा दावा केला होता, परंतु दुसऱयाच दिवशी प्रकल्पाच्या कंट्रोल सिस्टीममध्ये वापरण्यात आलेल्या संगणकांवर व्हायरसने हल्ला करण्यात आल्याचे मान्य केले होते. या सायबर हल्ल्यामुळे यंत्रणेवर कुठलाच प्रभाव पडला नव्हता, आण्विक संयंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला होता. हा प्रकार 4 सप्टेंबर 2019 रोजी घडला होता. कॉम्प्युटर इमर्जसी रिस्पॉन्स टीमला याची माहिती देण्यात आाली होती. आण्विक ऊर्जा विभागाच्या तज्ञानेही तत्काळ याची पडताळणी केली होती. यात इन्स्टीटय़ूच्या एका युजरच्या सिस्टीममध्ये व्हायरल होता आणि ते इंटरनेट नेटवर्कशी जोडलेले होते असे आढळून आले होते.

Related Stories

मुंबईतून १५ कोटी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी

Abhijeet Khandekar

टँकर-बस धडकेनंतर पाकिस्तानात 20 ठार

Patil_p

दोन आठवड्य़ात बाराव्यांदा इंधन दरवाढ

Patil_p

स्विगी, झोमॅटोमधून जेवण ऑर्डर करणं झाले महाग

prashant_c

माझा-दोआबामध्ये ‘आप’ची एंट्री, काँग्रेस अडचणीत

Patil_p

वर्षातून एकदा उघडणारे मंदिर

Patil_p