भारतीय सैनिकाचे छायाचित्र होतेय व्हायरल
मनं जिंकण्यात आणि शत्रूवर विजय मिळविण्यात भारतीय सैन्य अव्वल आहे. सोशल मीडियावर सध्या अनेक अशा पोस्ट्स समोर येत असतात, ज्यात सैनिक कडाक्याच्या थंडीत वर्कआउट करताना तर बर्फाळ प्रदेशात सेवा बजावताना दिसून येतात. ही छायाचित्रे आणि चित्रफिती पाहून आम्ही भावुक होतो आणि याचबरोबर आम्हाला धीरही मिळतो. आता एक असेच छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र पाहून तुम्हीही भारतीय सैनिकांना सलाम कराल.
हे छायाचित्र ट्विटरवर गृहमंत्री, तसेच पत्रकार हर्ष सांघवी यांनी शेअर केले आहे. ‘जेव्हा भावना आणि कर्तव्य सोबत चालते’ अशी कॅप्शन याला देण्यात आली आहे. या छायाचित्रात एक सैन्याधिकारी छोटय़ा मुलाला मांडीवर घेऊन बसल्याचे आणि त्याला अन्न भरवत असल्याचे दिसून येते. हे व्हायरल छायाचित्र रुग्णवाहिकेच्या मागील हिस्स्यातील आहे. एक अधिकारी मुलाला मांडीवर घेऊन बसल्याचे तर दुसरा अधिकारी त्याच्यासोबत आवश्यक सामग्री घेऊन उभा असल्याचे यात दिसून येते.
हे मनाला स्पर्श करणारे छायाचित्र पाहून लोकांच्या मनातील या सैनिकांबद्दलचा सन्मान ओसंडून वाहत आहे. भारतीय सैनिकांबद्दल गर्व असल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱया युजरने या छायाचित्राने मनं जिंकल्याची टिप्पणी केली आहे.