25 किलो प्लास्टिक जप्त : दंडात्मक कारवाईचा महानगरपालिकेकडून इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमिवर महानगरपालिकेने जागृती मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी प्लास्टिक साठा जप्त करण्याची कारवाई राबविली आहे. शनिवारी बाजारपेठेतील विपेत्यांकडून 25 किलोचे प्लास्टिक जप्त केले. तसेच यापुढे प्लास्टिक पिशव्यांचा साठा केल्यास अथवा विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या वतीने प्लास्टिक बंदी अंतर्गत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक बंदीसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली घालून दिली असून त्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली आहे. मात्र महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने सध्या प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र काही ठिकाणी सूचना देऊनही प्लास्टिक पिशव्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर काही विपेत्यांनी मोठय़ा प्रमाणात साठा करून ठेवला असून किरकोळ व्यावसायिकांनादेखील साठा करण्याची सूचना करीत आहेत. त्यामुळे काही प्लास्टिक विपेत्यांवर कारवाईचा बडगा महापालिकेने शनिवारी उगारला. बाजारपेठेतील विपेत्यांकडून 25 किलो प्लास्टिक जप्त केले. यापुढे प्लास्टिक पिशव्यांची विक्री केल्यास दंड वसूल केला जाईल. तसेच शिक्षेची तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती व्यावसायिकांना दिली.
पर्यायी साधने वापरण्याची सूचना
प्रारंभी जागृती करून असलेल्या पर्यायी साधनांचा वापर करण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाईस प्रारंभ केला जाणार आहे. तसेच भाजी अथवा कोणतेही साहित्य नेण्यासाठी कापडी पिशव्या घेऊन येण्याची सूचना व्यापारी ग्राहकांना करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही सूचना करीत असतानाच प्लास्टिकच्या पिशव्यादेखील उपलब्ध करून देत आहेत. दंडात्मक कारवाईस प्रारंभ झाल्यानंतर महापालिकेकडून ही कारवाई काटेकोरपणे राबविण्यात येणार का? महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.