Tarun Bharat

हिडकल-लोकूरमध्ये रेशनचा तांदूळसाठा जप्त

प्रतिनिधी /बेळगाव

जिल्हय़ात रेशन तांदळाचा काळाबाजार सुरूच आहे. शनिवारी हारुगेरी, ता. रायबाग व कागवाड पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

हारुगेरी पोलिसांनी केए 49, 1155 क्रमांकाच्या कँटरमधून वाहतूक करण्यात येत असलेली 11 टन 520 किलो तांदळाची 384 पोती जप्त केली. त्याची किंमत 2 लाख 53 हजार 440 इतकी होते. गुर्लापूर क्रॉसहून अथणीकडे जाताना हिडकलजवळ ही कारवाई केली.

कँटरचालक यमनाप्पा भीमाप्पा माळय़ागोळ (वय 47) रा. संगनकेरी, ता. मुडलगी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कलम 3, 7, अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून हा साठा कोठून आणण्यात आला, याची चौकशी करण्यात येत आहे.

दुसरी कारवाई कागवाड पोलिसांनी केली आहे. कागवाडचे अन्न निरीक्षक सुनील कत्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोकूर येथील बनशंकरी ऍग्रो प्रोसेस प्रा. लिमिटेडवर एफआयआर दाखल करण्यात आला असून प्रत्येकी 40 किलोची 55 पोती तांदूळ जप्त करण्यात आली आहेत. त्याची किंमत 48 हजार 400 इतकी आहे. लोकूर येथे ही कारवाई करण्यात आली असून कागवाड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरू

Amit Kulkarni

रामतीर्थनगरमधील इमारतीचे बांधकाम हटविले

Amit Kulkarni

मान्सून कर्नाटकात दाखल

datta jadhav

तालुक्याच्या विकासाचे स्वप्न हेच आपले राजकारण

Amit Kulkarni

मण्णूर येथील दुर्गामाता दौडला

Patil_p

बागलकोट जिल्हय़ात 8 जणांना कोरोना बाधा

Patil_p
error: Content is protected !!