एसजीएफआय स्पर्धेसाठी संघ पात्र
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत बेळगाव विभागीय संघाने विजेतेपद पटकाविले. बेळगाव विभागाच्या 11 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. चिकोडी येथील मुडलगी येथे घेण्यात आलेल्या 17 वर्षाखाली माध्यमिक मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत बेळगाव विभागीय संघाने बेंगळूर, म्हैसूर व गुलबर्गा विभागाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. बेळगाव विभागीय संघात जोया काझी (वनिता विद्यालय), श्रेया पोटे (महिला विद्यालय), निधी पाटील (महिला विद्यालय), गिरीजा कदम (वनिता विद्यालय), मनस्वी अंगडी (वनिता विद्यालय), गिरीजा बागीलकर (महिला विद्यालय), अनुजा हुंदरे, किर्तना अर्कसाली, भूमिका कम्मार, ज्ञानेश्वरी धुडूम, माही कंग्राळकर (सर्व वनिता विद्यालय) यांची कर्नाटक संघात निवड झाली आहे. या संघाचे जिल्हा शारीरीक शिक्षण प्रभारी अधिकारी सुरेखा मिर्जी, पीईओ जे. बी. पटेल यांनी कौतुक केले आहे.