वार्ताहर /किणये
कर्ले येथील ज्योती हायस्कूलच्या दोन खेळाडूंची जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच कडोली येथे तालुका पातळीवरील झालेल्या क्रीडा स्पर्धेतील 110 मी. अडथळा शर्यतीत सुरजित भरमाणी पाटीलने प्रथम क्रमांक तर रिया कृष्णा पाटीलनेही 100 मी. अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळविला. या दोघांचीही जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
क्रीडा शिक्षक अनंत पाटील यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळत आहे तर मुख्याध्यापक पी. जे. पाटील व सहशिक्षकांचे या खेळाडूंना प्रोत्साहन लाभत आहे.