Tarun Bharat

आकांक्षा गणेबैलकरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

वार्ताहर /खानापूर

बेळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत खानापूर ताराराणी कॉलेजची विद्यार्थिनी आकांक्षा गणेबैलकरने 1500 व 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या यशाबद्दल तिचे कॉलेजच्यावतीने कौतुक सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एन. ए. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नितीन पाटील बॉडी बिल्डर व मराठा मंडळ संस्थेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव एस. पाटील, पालक अर्जुन गणेबैलकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक ए. एल. पाटील यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते आकांक्षा गणेबैलकर हिचा पुष्पहार घालून गौरव करण्यात आला. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना कॉलेजचे प्राचार्य एन. ए. पाटील यांनी आकांक्षाचे कौतुक केले. तिला मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्य एन. ए. पाटील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्राध्यापक एन. एम. सनदी यांनी केले.

Related Stories

प्रशांत दडेदावर यांनी जिंकले 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक

Rohit Salunke

स्मार्ट बसस्थानकासमोर कचरा समस्येचे ग्रहण

Omkar B

खानापूरच्या सांडपाण्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात

Amit Kulkarni

जीआयटी बेळगावतर्फे दोन दिवसीय कार्यशाळा

Amit Kulkarni

बसवेश्वर चौकातील रस्ता बनला डम्पिग डेपो

Patil_p

खानापूर सरकारी दवाखान्यात 25 रोजी महाआरोग्य शिबिर

Amit Kulkarni
error: Content is protected !!