वार्ताहर /हिंडलगा
आंबेवाडी येथील भगतसिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिम्नॅस्टिकमध्ये जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. यामध्ये नीरज लोहार, नंदू कातकर, प्रविण दौलतकर, समर्थ तरळे, गौरव तरळे, कमलेश तुडयेकर या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय जिम्नास्टिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना क्रीडाशिक्षक जे. वाय. पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका एस. वाय. संभाजीचे व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे.