धारवाडच्या मनिकांत बुकीटगारचा समावेश
बेळगाव : विजय मर्चंट चषक 16 वर्षाखालील आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटकाच्या 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यामध्ये बेळगावच्या केएलएसचा विद्यार्थी सिद्धेश अनिल असलकर व धारवाड विभागाचा मनिकांत बुकिटगार यांची संघात वर्णी लागली आहे. बऱयाच कालावधीनंतर बेळगावचा खेळाडू कर्नाटक संघात खेळणार आहे.
विजय मर्चंट चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने 25 खेळाडूंची यादी जाहीर करुन त्यांच्यात 15 दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्यामधून राज्य निवड समितीने 25 मधून संभाव्य 15 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये आदिश दि. अर्स (कर्णधार), अनंथ एस., सिद्धेश अनिल असलकर (बेळगाव), देविक एस., अनिकेत रेड्डी, अर्णव शर्मा (यष्टीरक्षक), ऋषभ नायक (यष्टीरक्षक), अक्षत प्रभाकर, मनिकांत शिवानंद बुकीटगार (धारवाड), ईसा पुटगी, सम्यंक विलालोर, तेजस के. ए., मोहम्मद इब्राहिम राय्यन व हिमेश आर. या खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे प्रमुख प्रशिक्षक कुणाल कपूर, सहाय्यक प्रशिक्षक स्नेहित राई, फिजियोथेरपिस्ट गौतम एच. एस. तर संघ व्यवस्थापक सुमंथ पी. व्ही. यांचा समावेश आहे.