Tarun Bharat

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी धीरज पाटीलची निवड

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत गोमटेश स्कुलचा विद्यार्थी धीरज पाटीलने 800 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असून बेंगळूर येथे होणाऱया राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

रोटरी मनपा जलतरण तलावात आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत धीरज पाटील याने 800 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदक पटकाविले.

एनआयएस जलतरण प्रशिक्षक शाम मालाई, प्रशांत पाटील, गोमटेशचे क्रीडा शिक्षक श्रीहरी लाड यांचे त्याला मार्गदर्शन तर मुख्याध्यापक सुनील पाटील यांचे प्रोत्साहन लाभले आहे. त्याला एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

Related Stories

शहरासह तालुक्यात रक्षाबंधन उत्साहात

Omkar B

आनंद अकादमी, टॅलेंट हुबळी, स्पोर्ट्स अकादमी गदग संघ विजयी

Amit Kulkarni

पाणी शुद्धीकरण यंत्रात बिघाड नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

Patil_p

कर्लेत गवत गंजीला आग लागून शेतकऱयाचे 75 हजाराचे नुकसान

Patil_p

रस्ता चकाचक मात्र, सांडपाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

झेवर गॅलरी डायमंड संघाकडे विजेता चषक

Amit Kulkarni
error: Content is protected !!